किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलचेन्नई, (०६ सप्टेंबर) – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी चेन्नईमध्ये मोठ्या कारवाईत आयएसआयएस थ्रिसूर मॉड्यूलच्या फरार म्होरक्याला अटक केली. त्याने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच एजन्सीने त्याला पकडले. एका निवेदनानुसार, सय्यद नबील अहमद असे अटक आरोपीचे नाव असून तो त्रिशूरचा रहिवासी आहे. एनआयएचे एक पथक गेल्या काही आठवड्यांपासून अहमदच्या मागावर होते. आरोपी गेल्या अनेक आठवड्यांपासून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी लपून बसला होता. बनावट आणि फसव्या कागदपत्रांचा वापर करून नेपाळमार्गे परदेशात पळून जाण्याचा त्यांचा कट होता.
अटक करण्यात आलेल्या सय्यद नबील अहमद याच्या ताब्यातून गुन्ह्याची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जुलैपासून या प्रकरणात अटक झालेला तो तिसरा आरोपी आहे. या वर्षी जुलैमध्ये, एनआयएने आसिफ उर्फ मथिलकथ कोडायल अश्रफचा तामिळनाडूतील सत्यमंगलमजवळील लपून बसून माग काढला होता आणि त्याला अटक केली होती. हे मॉड्यूल आयएसच्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी निधी उभारण्यात गुंतले होते. ते दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते आणि त्यांनी याआधीच नेत्यांसह राज्यातील काही धार्मिक स्थळे आणि इतर प्रमुख स्थळांची रेकी केली होती. केरळमध्ये दहशत पसरवणे आणि जातीय तेढ निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता. एआयए ने ११ जुलै २०२३ रोजी नोंदवलेल्या या प्रकरणी तपास सुरू केला असून अनेकांना अटक करण्यात आली आहे.