किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– १ जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’,
कटक, (१० ऑक्टोबर) – ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणार्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी सांगितले की, पुढील वर्षी १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. सोमवारपासूनच भाविकांना ड्रेस कोडबद्दल जागरूक करणे सुरू करण्यात आले आहे.
माहितीनुसार, ड्रेस कोड लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पँट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही. मंदिराच्या धोरण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मंदिरात कोणते कपडे घालण्यास परवानगी द्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितले की, काही लोक अशोभनीय कपडे घालून मंदिरात येतात. काही लोक हाफ पँट आणि स्लीव्हलेस कपडे घालून येतात, जणू ते समुद्रकिनारी किंवा उद्यानात फिरायला आले आहेत. देव मंदिरात राहतो. हे मनोरंजनाचे ठिकाण नाही. यामुळे इतर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात.
जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणाले की, मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२४ पासून ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन केले जाईल. मंदिराच्या सिंहद्वारावर तैनात सुरक्षा दल आणि मंदिरातील प्रतिहारी सेवक त्यावर लक्ष ठेवतील.