किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिली माहिती,
नवी दिल्ली, (१० ऑक्टोबर) – इसरायल आणि पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून आधुनिक शस्त्रांनी होणार्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १,२०० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. युद्धाच्या भीषण आणि भयावह परिस्थितीदरम्यान, इसरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून युद्धाच्या ताज्या स्थितीची माहिती दिली आहे. भारत इसरायलच्या बाजूने ठामपणे उभा असून, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा भारत विरोध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
इसरायलच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय पंतप्रधानांनी ‘दहशतवादी हल्ला’ असे संबोधून त्याची कठोर शब्दात निंदा केली होती. भारताच्या मित्रराष्ट्रावर झालेल्या या हल्ल्याने आपल्याला धक्का बसला असून, आमच्या संवेदना आणि प्रार्थना निर्दोष पीडीत आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत आहेत. इसरायलवर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगी भारतराष्ट्र इसरायलच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले होते.
इसरायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज मंगळवारी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्धस्थितीची माहिती दिली. इसरायलच्या आगामी व्यूहरचना आणि हमासकडून होणार्या हल्ल्यांविषयीदेखील उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त आहे. भारताने इसरायलला आपल्या पाठींब्याचा पुनरुच्चार केला असून नेतन्याहू यांनी फोन केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.