किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (११ ऑक्टोबर) – गगनयान मोहीम प्रत्यक्षात हाती घेण्यापूर्वी त्याच्या ज्या काही महत्त्वाच्या चाचण्या करणे आवश्यक आहेत, त्यातील पहिली चाचणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो येत्या २१ ऑक्टोबर रोजी करणार आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.
ही पहिली चाचणी क्रू मॉड्यूलची असून, आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या अखेरीस प्रक्षेपित होणार्या गगनयान मोहिमेतील हा महत्त्वाचा भाग राहणार आहे; कारण अशाच मॉड्यूलमधून भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजीच्या चाचणीत टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाईटच्या (टीव्ही-डी१) माध्यमातून या क्रू मॉड्यूलला अंतराळात एका विशिष्ट उंचीपर्यंत नेण्यात येईल आणि नंतर ते बंगालच्या उपसागरात उतरविण्यात येणार आहे. हे मॉड्यूल सुखरूप समुद्रात आणण्यासाठी भारतीय नौदलानेही अलिकडील काळात काही कवायती केलेल्या आहेत, असे जितेंद्रसिंह यांनी सांगितले.
या चाचणीसोबतच ‘क्रू एस्केप’ यंत्रणेचीही चाचणी घेतली जाणार आहे. अंतराळात गेल्यानंतर यानात काही समस्या उद्भवल्यास अंतराळवीरांना पृथ्वीवर परत येणे सहज शक्य व्हावे, यासाठी ही विशेष यंत्रणा यानात समाविष्ट असणार आहे. या पहिल्या चाचणीला यश आल्यास देशाच्या पहिल्या मानवरहित आणि नंतर हाती घेण्यात येणार्या मानवी गगनयान मोहिमेला गती देण्यात येणार आहे, असे जितेंद्रसिंह यांनी सांगितले.