|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.32° से.

कमाल तापमान : 31.94° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 35 %

वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

31.94° से.

हवामानाचा अंदाज

24.55°से. - 31.94°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.97°से. - 28.27°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.86°से. - 29.14°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.71°से. - 28.32°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.78°से. - 27.76°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.41°से. - 27.59°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home » बिहार-झारखंड, राज्य » जदयूचे १७ आमदार राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात

जदयूचे १७ आमदार राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात

नितीश कुमार सरकारच्या भवितव्याबाबत मोठा गौप्यस्फोट,
पाटणा, ३० डिसेंबर – मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील संयुक्त जनता दलाचे १७ आमदार राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात असून, ते लवकरच पक्षात दाखल होतील, असा दावा मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राजदचे नेते श्याम रजक यांनी केला आहे.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी काठावरचे बहुमत मिळविले होते. मात्र, रालोआ अर्थात एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जदयू लहान पक्ष ठरल्याने राज्य सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, श्याम रजक यांनी सांगितले की, पक्षाबाहेर पडणारे सर्व आमदार भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे ते राजदमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या त्यांंना काही दिवस थांबविण्यात आले आहे. पक्षांतर कायद्यांतर्गत २५ ते २६ आमदार पक्ष सोडून राजदमध्ये आल्यास त्यांच्या सदस्यत्वाला धोका निर्माण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्या माध्यमातून १७ आमदार पक्षाच्या संपर्कात असून, सध्या राज्यासह देशातील घडामोडींवर नजर ठेवण्यात येत आहे. भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या सहा आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या घटनेमुळे भाजपा नितीश कुमार यांच्यावर वर्चस्व दाखवू लागल्याचे दिसत असल्याचा दावा रजक यांनी केला. दुसरीकडे जदयूचे प्रवक्तेराजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा दावा फेटाळला आहे. हा सर्व प्रकार भ्रामक आणि दिशाभूल करणारा असून, सरकार पूर्णपणे एकसंध आहे. भाजपासोबत सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.
विधानसभेतील पक्षीय बलाबल असे
– एकूण जागा २४३
-बहुमताचा आकडा १२३
-एनडीए १२५ (भाजपा ७४, जदयू, ४३, इतर ८)
-महाआघाडी ११०

Posted by : | on : 30 Dec 2020
Filed under : बिहार-झारखंड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g