किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-सिक्कीममधील आपत्तीचा आढावा
गंगटोक, (०७ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सिक्कीममधील आपत्तीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत. सिक्कीममधील लोकांचे जीवन सामान्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. सिक्कीममधील तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तीन दिवसांच्या सिक्कीम दौर्यावर आहेत. आपल्या दौर्यादरम्यान मिश्रा राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि वरिष्ठ सरकारी अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
राजधानी गंगटोकमधील ताशिलिंग सचिवालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री म्हणाले की, या दुर्घटनेने सिक्कीममधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दुर्घटनेनंतर राज्यातील जनतेसमोर रस्ते, दळणवळण, वीज, पाणी, पायाभूत सुविधा, अन्नधान्य आदी आव्हाने आहेत. परिस्थिती सामान्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत.
केंद्रीय मंत्री मिश्रा म्हणाले की, सिक्कीममधील नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री सिक्कीम सरकारच्या सतत संपर्कात असून येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्याच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्याच्या मागणीनुसार तीन एनडीआरएफ टीम सिक्कीमला पाठवल्या आहेत आणि राज्यात आधीच तैनात असलेली एक एनडीआरएफ टीम आणि एसडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहे.
एक आंतरमंत्रालय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीमध्ये गृह, कृषी, रस्ते, जलशक्ती, ऊर्जा आणि वित्त मंत्रालयांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती राज्यातील नुकसानीचे मूल्यांकन करून अहवाल सादर करणार आहे. समितीच्या अहवालानुसार सिक्कीमला तातडीने निधी देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. राज्यातील ज्या भागात काम आधी व्हायला हवे, त्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन काम केले जात आहे. आम्ही लवकरच या आव्हानातून बाहेर पडू आणि परिस्थिती सामान्य करण्यात यशस्वी होऊ, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.