किमान तापमान : 25.49° से.
कमाल तापमान : 26.49° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 3.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.49° से.
24.38°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलजम्मूत स्पष्ट बहुमतासह भाजपाचाच अध्यक्ष,
श्रीनगर, २३ डिसेंबर – जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर करण्यात आले असून, यात सात पक्षांच्या गुपकार आघाडीने बाजी मारल्याचे दिसत असले तरी, भाजपा स्वबळावर ७४ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
जिल्हा विकास परिषद निवडणुकीत भाजपाविरुद्ध सात दलांनी एकत्र येत गुपकार आघाडी स्थापन केली. यात नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, माकप, भाकप या पक्षांचा समावेश आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने काश्मीर खोर्यात प्रथमच खाते उघडताना सहा जागांवर विजय मिळविला. आठ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीची सुरुवात २८ नोव्हेंबर रोजी झाली होती. एकूण २८० जागांवर मतदान घेण्यात आले. या २८० पैकी १४० जागा जम्मू आणि १४० जागा काश्मीर विभागात येतात.
निवडणुकीत जम्मू विभागात भाजपाने स्पष्ट बहुमत घेतले असून, जिल्हा विकास परिषद अध्यक्ष भाजपाचाच राहणार आहे. जम्मू, सांबा, कठाव, उधमपूर, डोडा आणि रियासी या सहा जिल्ह्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळाले आहे.
पक्षनिहाय स्थिती
भाजपा ७४
नॅशनल कॉन्फरन्स ६७
पीडीपी २७
कॉंगे्रस २६
जेकेएपी १२
जेकेपीपी ८
माकप ५
भाकप ३
पीओएफ २
जेकेएनपीपी २
बसपा १
अपक्ष ४९