किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलकॉंग्रेस-डाव्यांच्या युतीचे संकेत,
नवी दिल्ली, २४ डिसेंबर – पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, ममता बॅनर्जींचा तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस व डाव्या पक्षांची आघाडी अशी तिहेरी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांशी युती करण्यास पक्षश्रेष्ठींनी हिरवी झेंडी दाखवली असल्याचे ट्विट पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केले आहे.
पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होणार्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि डावे पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. डाव्या पक्षांनी यापूर्वीच कॉंग्रेसशी युती करण्याची तयारी दर्शविली होती. आता कॉंग्रेसनेही डाव्या पक्षांसोबत निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कॉंग्रेस आणि डाव्यांनी मिळून निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी दिली. यासंदर्भातील ट्विटही त्यांनी केले. डाव्या पक्षांसोबत युती करण्यास कॉंग्रेस हायकमांडने हिरवा कंदील दाखविला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे २०१६च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बंगालमध्ये कॉंग्रेस आणि डावे, भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता बळावली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि डाव्यांनी एकत्रित निवडणूक लढविली होती. त्यावेळी ४४ जागा जिंकून विधानसभेत कॉंग्रेस दुसर्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. सीपीएमला २६ आणि उर्वरित डाव्या पक्षांना काही जागा मिळाल्या. भाजपला केवळ ३ जागा जिंकता आल्या होत्या.
मात्र, आज राज्यातील परिस्थितीत बराच बदल झाला आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या काम करण्याच्या पद्धतीला कंटाळून डझनावर आमदारांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. पक्ष बदल केल्याने कॉंग्रेसकडे केवळ २३ आमदार उरले आहेत. नुकत्याच दोन डाव्या-आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर डावे आणि कॉंग्रेस मिळून किती यश मिळवणार, याची उत्सुकता आहे.