किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.65° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलअनुसूचित जमातीसाठी मतदारसंघ निश्चित करणार,
नवी दिल्ली, ९ जुलै – २०११ च्या जनगणनेच्या आधारे जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या सात जागा वाढणार असल्याची तसेच अनुसूचित जमातीसाठी यावेळी प्रथमच मतदारसंघ राखीव केले जाणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुशीलचंद्रा यांनी आज शुक्रवारी केली.
परिसीमन आयोगाने शुक्रवारी जम्मूचा दौरा केला, त्यानंतर जम्मूत आयोजित पत्रपरिषदेत सुशीलचंद्रा बोलत होते. मतदारसंघाची फेररचना (परिसीमन प्रक्रिया) ही अतिशय कठीण बाब असली तरी ती करावीच लागणार आहे. येथे विधानसभेच्या सात जागा वाढविण्यात येणार आहेत, यामुळे येथील मतदारसंघांची संख्या ९० होणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी प्रथमच अनुसूचित जमातीसाठी मतदारसंघ राखीव ठेवले जाणार आहेत, अशी माहिती सुशीलचंद्रा यांनी दिली.
पाकव्याप्त काश्मीरच्या २४ जागा राखीव ठेवण्यात येणार आहे, याकडे लक्ष वेधत सुशीलचंद्रा म्हणाले की, या जागा आहेत, तशाच ठेवल्या जाणार आहे. या जागांसाठी निवडणूक होत नाही. मार्च २०२२ पर्यंत या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांच्या फेररचनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मतदारसंघाच्या फेररचनेचा निर्णय २०११ च्या जनगणनेच्या आधारे घेतला जाणार आहे.
समन्वय अधिकारी नियुक्त करणार
१९९५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील जिल्ह्यांची संख्या १२ होती, ती आता २० झाली आहे. तालुक्यांची संख्याही वाढली आहे, त्यामुळे मतदारसंघांची संख्या वाढवणे आवश्यक झाले आहे, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांची भेट घेत आम्ही त्यांच्याकडे परिसीमन आयोगासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केल्याचे सुशीलचंद्रा यांनी सांगितले.
सर्व घटकांचे चांगले सहकार्य : न्या. देसाई
परिसीमन आयोगाच्या अध्यक्ष माजी न्यायमूर्ती रंजना देसाई म्हणाल्या की, परिसीमनाच्या प्रक्रियेचा मसुदा तयार करून तो लोकांच्या माहितीसाठी जाहीर केला जाईल. यावर लोकांच्या सूचना मागवून त्याआधारे परिसीमनाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. परिसीमनाच्या प्रक्रियेसाठी आम्हाला सर्व घटकांचे सहकार्य मिळत आहे. आवश्यकतेप्रमाणे आम्ही अनेकवेळा दौरा करू शकतो.
जम्मू-काश्मिरातील सर्व राजकीय पक्षांची नुकतीच बैठक बोलावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसीमनाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे तसेच विधानसभा निवडणूक होतील, असे संकेतही त्यांनी दिले होते.
केंद्रशासित प्रदेश करण्याचे फायदेच
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा निष्प्रभ करून जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. यामुळे येथील जनतेला फायदाच होत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत, असे त्यांनी सांगितले. आता विधानसभेच्या जागा वाढणार असल्याने, लोकांमध्ये उत्साह आहे, असे त्यांनी सांगितले.