किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलमलपुरम्, १० जुलै – ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आणि कोट्टाक्काल आर्य वैद्य शाळेचे व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. पी. के. वॉरियर यांचे आज शनिवारी निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ते १०० वर्षांचे होते.
डॉ. वॉरियर यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ८ जून रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले होते. त्यांनी जगभरात आयुर्वेदिक उपचार करून, असंख्य लोकांना जीवनदान दिले आहे.
कोट्टाक्कल येथील प्रख्यात आर्य वैद्य शाळा आणि आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाला देशात आणि जगात नावलौकिक मिळवून देण्यात डॉ. वॉरियर यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. काही दशकांपूर्वी त्यांनी या दोन्ही संस्थांची सूत्रे हातात घेतल्यानंतर या संस्था जगात लोकप्रिय झाल्या.
त्यांचा जन्म ५ जून १९२१ रोजी झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी कोट्टाक्कल आर्य वैद्य शाळेत प्रवेश घेतला. भारत छोडो आंदोलनातही ते सहभागी होते. यासाठी त्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण सोडले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, राजकारण हे आपले क्षेत्र नाही, याची जाणीव होऊन त्यांनी पुन्हा आयुर्वेदाचा अभ्यास सुरू केला होता. पदवी घेतल्यानंतर ते याच संस्थेत विश्वस्त म्हणून रुजू झाले होते.