किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलविशेष पथकाची कामगिरी; चार जणांना अटक,
नवी दिल्ली, १० जुलै – मादक पदार्थांच्या तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करीत दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने येथे ३५० किलो हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनचे मूल्य २५०० कोटी रुपये असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.
मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या विरोधात मिळालेले हे एक मोठे यश असून, आम्ही ३५४ किलो हेरॉईन जप्त केले आहे. अटक केलेल्या चार आरोपींपैकी एक अफगाणिस्तानचा नागरिक आहे. एक पंजाबमधील, तर आणखी एक काश्मिरातील आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
अफगाणिस्तानातील कायदेशीर निर्यात साहित्याच्या माध्यमातून इराणच्या बंदरातून हे हेरॉईन मुंबईला पाठवण्यात आले होते. या आरोपींनी मध्यप्रदेशात एक तात्पुरता कारखानाही उभारला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली.
डार्कनेट आणि ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री करणारी टोळी मादकपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात् एनसीबीने मागील महिन्यात उद्ध्वस्त केली होती. या कारवाईत मनोरुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्या २२ लाख गोळ्या, कोडेन आधारित खोकल्याच्या औषधाच्या ७० हजार बाटल्या आणि २४५ किलो मादकपदार्थ जप्त करीत आठ जणांना अटक करण्यात आली होती. मादकपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी एनसीबीने विशेष मोहीम हाती घेत दिल्ली, राष्ट्रीय राजधानी परिसर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात छापेमारी देखील केली होती.
तस्करीसाठी डार्कनेटचा वापर
अमलीपदार्थांची विक्री करणार्यांना डार्कनेटवरून मागणी केली जाते. आभासी स्वरूपात औषध विक्री करणार्यांच्या माध्यमातूनही मादकपदार्थांची मागणी करण्यात येते, अशी माहिती दिली.