|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.39° से.

कमाल तापमान : 25.79° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 2.15 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

25.79° से.

हवामानाचा अंदाज

24.27°से. - 28.58°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.07°से. - 29.1°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 28.81°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.93°से. - 29.28°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.59°से. - 28.72°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.96°से. - 28.47°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
Home » उत्तर प्रदेश, राज्य » भाजपाचा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय

भाजपाचा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय

उत्तर प्रदेशात ६४० जागी विजयी,
लखनौ, १० जुलै – उत्तरप्रदेशातील पंचायत प्रमुखांच्या (सरपंच) आज शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी असून, त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, भाजपाने विरोधकांचा धुव्वा उडवला. शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी भाजपाने ८२५ पंचायत प्रमुखांच्या जागांपैकी ६४० जागांवर विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षाला आतापर्यंत केवळ ६३ जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीचे मतदान आज सकाळी ११ वाजता सुरू होऊन दुपारी ३ वाजता संपले. भाजपाचे ३३४ पंचायत प्रमुख आधीच बिनविरोध निवडून आले होते. इतर ठिकाणी समाजवादी पार्टी आणि अपक्ष उमेदवार निवडून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी ‘सबका साथ सबका विश्‍वास’ ही घोषणा केली होती. केंद्राच्या कल्याणकारी योजनांचा फायदा ग्रामीण भागात झाला. उत्तरप्रदेश सरकार आणि भाजपा संघटनाने या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. पंचायत निवडणुकीतील विजय त्याचेच उदाहरण आहे. या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते, अशी प्रतिक्रिया उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.
उत्तरप्रदेशातील नागरिकांचा कल भाजपाकडेच होता. भाजपाने तयार केलेली व्यूहरचना यशस्वी ठरली. जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपा अव्वल ठरला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. येथे कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. मुली रात्री बारा वाजताही घराबाहेर पडू शकतात. कुठेही भ्रष्टाचार होत नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र केलेल्या परीश्रमांमुळे हा विजय मिळाला, असे उत्तरप्रदेशातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव यांनी सांगितले.
हिंसाचाराचे गालबोट, अनेक जखमी
उत्तरप्रदेशातील सरपंचपदाच्या (ब्लॉक प्रमुख) निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सुरू झालेला हिंसाचार आज शनिवारी देखील कायम होता. सरपंचपदाची निवडणूक आणि मतमोजणीदरम्यान आज उन्नाव, इटवाह, हमिरपूर, आमरोह, चंदौलीसह काही जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे.
उन्नाव येथील मियागंज खंडात खंडविकास समितीच्या सदस्यांना मतदानापासून रोखण्यात आले तसेच शेतांमध्ये त्यांचा पाठलाग करून समाजकंटकांनी त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात आले. या हिंसाचाराचे वार्तांकन करणारे प्रतिनिधी आणि त्यांची वाहने समाजकंटकांकडून रोखण्यात आली. हमीरपूर येथे भाजपा आणि सपाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारादरम्यान कित्येक वाहनांची तोडफोड करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी येथे लाठीमार केला. पोलिसांच्या कारवाईत काही जण जखमी झाले. हिंसाचारात गुंतलेल्यांवर पोलिस कारवाई करीत आहे. जालौन येथील शाळेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खंडविकास समितीच्या ४९ सदस्यांसह आपल्याला शुक्रवारी मारहाण केली, असा आरोप येथील सपाचे उमेदवार जयनारायण यादव यांनी केला. जालौन पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सुटका झाल्यावर यादव आज मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा हिंसाचार झाला. समाजकंटकांनी काही वाहनांची तोडफोड केली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, अशी माहिती हमिरपूरचे पोलिस अधीक्षक नरेंद्रसिंह यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
ठळक वैशिष्ट्ये
ऋ वाराणसीत सर्वच ८ पंचायती ताब्यात, दोन जागा युतीतील अपना दलाला
ऋ अयोध्येतील ७ पैकी ६ पंचायतींवर भाजपाचा झेंडा, एक पंचायत सपाला
ऋ मुजफ्फरनगर येथील ९ पंचायतींपैकी ८ वर भाजपा
ऋ मेरठमधील २२ पैकी १२ पंचायतींवर भाजपा, तर ६ ठिकाणी सपा
ऋ जौनपूर येथे भाजपाला १४, तर सपा दोन पंचायतींमध्ये विजयी
ऋ फिरोजाबादमधील ९ पैकी ९ पंचायतींवर भाजपाचा झेंडा
ऋ आजमगडमध्येही फडकला भगवा
ऋ भाजपा ६४० ठिकाणी विजयी, सपाच्या खात्यात ६३ जागा, ७६ ठिकाणी अन्य उमेदवारांचा विजय

Posted by : | on : 10 Jul 2021
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g