किमान तापमान : 26.73° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.55°से. - 27.39°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलउत्तरप्रदेश एटीएसची मोठी कामगिरी, प्रेशर कूकर बॉम्ब व शस्त्रांचा साठा जप्त, १५ ऑगस्टला होती मोठ्या हल्ल्याची योजना,
लखनौ, ११ जुलै – उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने आज रविवारी लखनौ आणि काकोरी येथे जोरदार छापेमारी करीत, अल् कायदाच्या दोन अतिरेक्यांना अटक केली. त्यांच्याजवळून प्रेशरकूकर बॉम्ब, एक टाईम बॉम्ब, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. १५ ऑगस्ट रोजी राज्यातील काही संवेदनशील भागांमध्ये मोठ्या हल्ल्यांचा कट या अतिरेक्यांनी रचला होता.
या अतिरेक्यांचे नाव नसीरुद्दिन आणि मिनहाज अहमद असून, हे दोघेही अल् कायदाच्या स्लिपर सेलचे सदस्य आहेत. गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या हालचालींची माहिती दिल्यानंतर एटीएसने आज सकाळपासून लखनौ आणि काकोरी येथे छापेमारीचे सत्र हाती घेतले होते, अशी माहिती एटीएसचे पोलिस महानिरीक्षक जी. के. गोस्वामी यांनी दिली.
आदेश मिळाला आणि सक्रिय झाले
हे दोघेही स्लिपर सेलचे सदस्य असल्याने, ते आतापर्यंत सामान्य माणसांप्रमाणेच वावरत होते. मात्र, अलिकडेच त्यांना काश्मीर खोर्यातील म्होरक्यांकडून आदेश मिळाला आणि ते सक्रिय झाले. याची माहिती गुप्तचर यंत्रणांना हे अतिरेकी जिथे राहात होते, तेथील शेजार्यांनीच दिली होती. त्यामुळे या दोन्ही अतिरेक्यांचे काश्मिरी संबंधही उघडकीस आले आहे. या अतिरेक्यांचे आणखीही काही साथीदार राज्यात लपले असण्याची शक्यता घेऊन, विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. अल् कायदाच्या या नेटवर्कमध्ये अनेकांचा सहभाग असल्याचे गोस्वामी यांनी सांगितले.
दुबईहून आला होता शाहिद
नसीरुद्दिनच्या घरात मागील काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली वाढल्या होत्या. सूत्रांच्या मते, नसीरुद्दिन नऊ वर्षांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेला होता. तिथेच तो अल् कायदाच्या संपर्कात आला होता. उत्तरप्रदेशातील तरुणांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. छापेमारी सुरू होताच नसीरुद्दिनने काही कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न केला. अर्धवट जळालेली ही कागदपत्रे एटीएसच्या अधिकार्यांनी जप्त केली आहे.
अल् मंदी अतिरेक्यांचा म्होरक्या
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर सक्रिय असलेला अल् कायदाचा नेता अल् मंदी हा जम्मू-काश्मिरातील अतिरेक्यांचा म्होरक्या असून, त्याच्यामार्फतच काश्मिरातील अतिरेक्यांनी नसीरुद्दिनव अन्य अतिरेक्यांना आदेश दिला होता, असेही गोस्वामी यांनी सांगितले.
थेट पाकिस्तानशी संबंध
अटक करण्यात आलेले दोन्ही अतिरेकी अल् कायदाच्या गझवतुल हिंद या संघटनेचे सदस्य असून, ही संघटना पाकिस्तानच्या आश्रयात असल्याने, अतिरेक्यांचे थेट संबंध पाकिस्तानशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या इमारतीत छापेमारी झाली, तिथे सात लोक राहात होते. छापेमारीत पाच जणांनी पळ काढल्याची माहिती असून, त्यांचा शोध घेण्यासाठी हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्नाव आणि रायबरेलीसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
टेलिग्रामवरून पाकी हस्तकांच्या संपर्कात
शाहिद हा या सर्वांचा स्थानिक म्होरक्या होता आणि तो टेलिग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानी हस्तकांच्या संपर्कात असायचा. अल् उल असे या हस्तकाचे नाव आहे.