किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपाटणा, (०२ ऑक्टोबर) – बिहारमध्ये जात जनगणनेची आकडेवारी जाहीर झाली आहे. प्रभारी मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विभागीय माहितीनुसार २१५ जातींची आकडेवारी जारी केले आहे. सरकारी अहवालानुसार, बिहार ३६ टक्के अत्यंत मागास, २७ टक्के मागासवर्गीय, १९ टक्के अनुसूचित जाती आणि १.६८ टक्के अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जात जनगणनेची आकडेवारी जाहीर: प्रभारी मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी सोमवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की २१५ जातींची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये हिंदू ८१.९९८६%, इस्लाम १७.७०८८%, ख्रिश्चन ०.०५७६% नोंदवले गेले आहेत. धर्मनिहाय आकडेवारीसोबतच जातीनिहाय आकडेवारीही जाहीर करण्यात आली आहे.
जातींची आकडेवारी खालीलप्रमाणे
ज्यामध्ये यादव १४.२६६६%, कुर्मी २.८७८५%, कुशवाह ४.२१२०%, ब्राह्मण ३.६५७५%, बनिया २.३१५५%, भूमिहार २.८६८३%, राजपूत २.४५०५%, मुसहर ३.०८७२% , मल्लाह २.६०८६%, बनिया २.३१५५% नोंदवले गेले आहे. यासोबतच इतर जातींची आकडेवारीही जाहीर केली जात आहे. ७ जानेवारीपासून सुरू झाली जात जनगणना : बिहारमध्ये सीएम नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जात जनगणना कार्यक्रम पार पडला. या वर्षी ७ जानेवारीपासून जात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला होता, जो २१ जानेवारीला पूर्ण झाला होता. १५ एप्रिलपासून दुसरा टप्पा सुरू झाला, दरम्यान हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यामुळे दुसर्या टप्प्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले. जात जनगणना दोन टप्प्यात करण्यात आली, जात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि मोजणी करण्यात आली होती. दुसर्या टप्प्यात कुटुंबांची संख्या आणि त्यांची राहणीमान, उत्पन्न इत्यादी माहिती गोळा करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने दुसर्या टप्प्यातील केवळ ८० टक्के काम पूर्ण झाले असले तरी निवडणुकीपूर्वी आकडेवारी जाहीर करण्याचे उद्दिष्ट या विभागाने पूर्ण केले आहे.