किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– पंतप्रधानांचा राज्य सरकारवर हल्लाबोल,
जयपूर, (०२ ऑक्टोबर) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यात काँग्रेसने सुरू केलेल्या योजना थांबवू नका, अशी विनंती केली आहे. यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला आहे, असा टोला हाणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमी दिली की, काँग्रेस कार्यकाळातील कोणतीही योजना बंद होणार नाही. उलट त्यात सुधारणा करण्यात येईल. चित्तौडगड येथे सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून पक्ष कुणाचाही चेहरा जाहीर करणार नाही. भाजपा कमळ या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल प्रभृती उपस्थित होते. राज्यात भाजपाची सत्ता आल्यास काँग्रेस सरकारच्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, याची हमी मोदींनी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नुकतीच केली होती. त्यावर मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारची उलट गिनती सुरू झाली आहे, हे गहलोत यांना लक्षात आले. योजना बंद करू नका, अशी जाहीर विनंती करून त्यांनी एकप्रकारे भाजपाचे अभिनंदन केले आहे. भाजपा जनहिताची कोणतीही योजना बंद करणार नसून, ती सुधारण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही मी देतो.
भ्रष्टाचार आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून गहलोत सरकारवर त्यांनी टीका केली. राज्यात पेपर फोडणार्या माफियांना जबाबदार धरून त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मोदी म्हणाले. गेल्या वर्षी उदयपूरमध्ये शिंपी कन्हय्या लालच्या निर्घृण हत्येचा संदर्भ देत, राज्यातील जनतेने यासाठी काँग्रेसला मतदान केले होते का, असा सवाल मोदींनी उपस्थित जनसमुदायाला केला. उदयपूरमध्ये काय घडले, याची तुम्ही कल्पना केली होती का? कपडे शिवण्याच्या बहाण्याने लोक येतात, शिंप्याचा गळा चिरतात आणि व्हिडीओ बनवून व्हायरल करतात आणि त्यातही काँग्रेसला मतांची काळजी वाटते, असा जोरदार प्रहार त्यांनी राज्य सरकारवर केला.