किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.59° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.53°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.54°से. - 27.92°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.47°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.11°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.83°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.33°से. - 28.71°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल– उत्तर प्रदेशातील देवरिया येथील घटना,
देवरिया, (०३ ऑक्टोबर) – उत्तरप्रदेशातील देवरिया जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या रक्तरंजित संघर्षात ६ जणांची विटांनी व धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. रुद्रपूर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फतेहपूर गावातील दोन कुटुंबांमध्ये जमिनीचा जुना वाद होता. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास दोन कुटुंबांत वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंनी लाठ्या, रॉड, धारदार शस्त्रे आणि बंदुका बाहेर निघाल्या. काही वेळातच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. एका बाजूचे पाच आणि दुसर्या बाजूच्या एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या पोलिस ठाण्यांमधून पोलिसांना पाचारण करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवरियातील घटनेवर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, देवरिया जिल्ह्यातील घटना अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या आणि जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.