किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशअभाविप-एआयएसएच्या सदस्यांमध्ये खडाजंगी,
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डावी आघाडी ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (एआयएसए) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. यातील काही जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यांवर नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची औपचारिक तक्रार दिल्ली पोलिसांकडे करण्यात आली आहे, असे विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोन्ही संघटनांचे सदस्य एकमेकांवर हिंसाचार सुरू केल्याचा आरोप करीत आहेत. जेएनयूमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना झालेली नाही. जेएनयू यापूर्वीही वादात सापडले आहे. ६ जानेवारी २०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या हल्ल्यासाठी डाव्या संघटनांना जबाबदार धरले होते.
जेएनयूमध्ये शिकणारे काही अभाविपचे सदस्य माध्यमांसमोर आले होते. त्यांनी डाव्या संघटनांवर हल्ल्याचा आरोप केला. हिवाळी अधिवेशनासाठी नोंदणीवरून ही हाणामारी झाल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, ७०० लोक (डाव्या संघटनांचे) शांती मोर्चासाठी जमले होते आणि त्यांनीच सर्व्हर रूमचे नुकसान केले जेणेकरून नोंदणी विस्कळीत होईल.