किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशगुजरात एटीएसची मोठी कारवाई,
गांधीनगर, १५ नोव्हेंबर – गुजरात एटीएसने मोरबी जिल्ह्यातील मलिया मियाना येथून १२० किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. या अमली पदार्थाची बाजारातील किंमत ६०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग्ज माफिया खालिद बख्शशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
ड्रग्जसोबतच पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात बाहेर येत असलेल्या खालिद नावाच्या व्यक्तीचा संपर्क थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जच्या खेपेची पटकथा दुबईत लिहिण्यात आल्याचेही बोलले जात आहे. पाकिस्तानी ड्रग्ज माफिया खालिदने जब्बार आणि गुलाम नावाच्या दोन भारतीय तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टिनमध्ये भेट घेतली होती. सध्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
विशेष म्हणजे, याआधीही पाकिस्तानी ड्रग माफिया खालिदने अमली पदार्थांची मोठी खेप भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. याच आठवड्यात गुजरातमधील पोलिसांनी देवभूमी द्वारका आणि सूरतमध्ये हेरॉईनसह अन्य अमली पदार्थ जप्त केले. यावेळी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली होती.