किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैद्राबाद, १९ नोव्हेंबर – श्री बालाजी देवस्थानसाठी जगप्रसिद्ध असलेल्या तिरुमला येथे मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प झाली असून व्यंकटेश्वराच्या प्राचीन मंदिरापर्यंत मुख्य मार्गावर पाणी आले आहे. हजारो भाविक तिरुपती, तिरुमला येथे अडकले असून, विमानसेवाही विस्कळित झाली. गुरुवार दुपारपासून पडणार्या पावसाने घाटात पाणी आल्याने घाटरस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच पायी मार्गही बंद केला आहे.
चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथे पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरात अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिरुपती आणि तिरुमला येथे पाण्याची पातळी वाढली आहे.
यात मधुरा नगर, गोलावनी गुंटा, लक्ष्मीपूरम्, एअर बायपास, चंद्रगिरी आणि कपिला थिरथम मंदिर येथे पाणी साचले आहे. तिरुमला पर्वतरांगांतून पाणी वाहत असल्याने मंदिर परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. हजारो भाविक अडकले असून, दुचाकी वाहने आणि ऑटोरिक्षा पाण्यात गेल्या आहेत. झाडेही पडली आहेत. मुसळधार पावसामुळे सप्तगिरी पर्वताची वाहतूक थांबवली गेली आहे. तिरुमला येथे विश्रांतीगृहात पाणी असल्याने भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पुरामुळे तिरुपती-हैदराबाद मार्गावरीलही वाहतूक खोळंबली आहे.
आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी नेल्लोर, चित्तूर आणि कड्डपाच्या विभागीय आयुक्तांशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली व आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत.