किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशचंद्राबाबूंची अनोखी प्रतिज्ञा,
अमरावती, १९ नोव्हेंबर – तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी, सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या सदस्यांद्वारे झालेल्या अपमानाच्या निषेधार्थ, आपण उर्वरित कालावधीसाठी विधानसभेत प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. मी मुख्यमंत्री झाल्यावरच सभागृहात पाय ठेवेल, असे नायडू यांनी जाहीर केले.
विधानसभेतून बाहेर पडण्यापूर्वी नायडू खूपच भावुक दिसत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी महिला सबलीकरणावरील चर्चेत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पणीबद्दल नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मंगलागिरी येथील टीडीपीच्या राज्य मुख्यालयात पत्रपरिषदेत बोलताना नायडू यांना अश्रू अनावर झाले. काही मिनिटे ते बोलू शकले नाहीत. हाताने चेहरा झाकून ते काही मिनिटे रडत होते.
माझी पत्नी कधीही राजकारणात नव्हती. मी सत्तेत असो की बाहेर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त तिने कधीच राजकारणात हस्तक्षेप केला नाही. तरीही त्यांनी माझ्या पत्नीला अपमानित करण्याचा प्रयत्न केला, असे नायडू म्हणाले. आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत इतके दु:ख कधीच जाणवले नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक संघर्ष, चढ-उतारांचा सामना केला. मी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात अनेक जोरदार वादविवाद पाहिले. मात्र, विरोधकांना अशा प्रकारे चिरडणे हे अभूतपूर्व आहे, असे नायडू म्हणाले.
कार्यकर्त्याचीही प्रतिज्ञा!
चंद्राबाबू नायडू यांची घोषणा चर्चेत असतानाच त्यांच्या पक्षाचे नेते कप्पेरा श्रीनिवासुलू यांनी अजब शपथ घेतली आहे. चंद्राबाबू सत्तेवर येईपर्यंत अर्धे मुंडण आणि अर्धी मिशी ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.