किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलप्रयागराज, (०७ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजेच्या परवानगीविरोधात दाखल याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात आज सुमारे २ तास सुनावणी झाली. आता या प्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान प्रथम ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी मंदिराच्या बाजूने आणि नंतर मशिदीच्या बाजूने एसएफए नक्वी यांनी आपली बाजू मांडली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणाची सुनावणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिमांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील एसएफए नकवी म्हणाले की, ३१ जानेवारी २०२४ च्या आदेशानुसार, जिल्हा न्यायाधीशांनी खटल्यातील प्रारंभिक टप्प्यावर मागितलेला अंतिम दिलासा मंजूर केला, ज्याला परवानगी दिली जाऊ शकत नाही. नक्वी पुढे म्हणाले की, हा आदेश अतिशय घाईघाईने देण्यात आला आणि तोही ज्या दिवशी संबंधित न्यायाधीश निवृत्त होणार होते. हिंदू बाजूच्या वतीने अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, रिसीव्हरची नियुक्ती तसेच देवतेची पूजा करण्यासाठी त्यांचा अर्ज १७ जानेवारी २०२४ रोजी स्वीकारण्यात आला होता. ते म्हणाले की, १७ जानेवारी २०२४ रोजी केवळ रिसीव्हरची नियुक्ती करण्यासाठी आदेश पारित करण्यात आला होता आणि ३० जानेवारी २०२४ रोजी नमूद केलेल्या पूजेच्या प्रार्थनेच्या इतर भागावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि न्यायालयाने पुढील सुनावणीचा दिवस निश्चित केला. ३१ जानेवारीला पूजेची ऑर्डर पार पडली.