किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.92° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशअयोध्या, (१८ जानेवारी) – प्रभू श्रीराम त्यांच्या घरात प्रवेश करतील, त्याच दिवशी स्वत:च्या हाताने अन्न शिजवेन आणि खडे मीठ खाऊन आपला नवस सोडणार, अशी शपथ दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर तालुक्यातील खैरा गावाचे रहिवासी वीरेंद्रकुमार बैठा उपाख्य झमेली बाबा यांनी घेतली होती. तब्बल ३१ वर्षे ते फळे खाऊन जीवन जगत आहेत. आता २२ जानेवारी रोजी त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठेला झमेली बाब अन्नग्रहण करणार आहेत.
वीरेंद्रकुमार बैठा उपाख्य झमेली बाबा हे लहानपणापासून रा. स्व. संघात कार्यरत आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावरून ते दरभंगा येथून सुमारे अडीचशे कारसेवकांसह अयोध्येला रवाना झाले होते. राम मंदिर आंदोलनात झमेली बाबा सक्रिय होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येमधील वादग्रस्त ढाचा पाडण्यातही ते आघाडीवर होते. वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर ७ डिसेंबर १९९२ राजी त्यांनी अन्नग्रहणाचा त्याग केला. प्रभू श्रीराम त्यांच्या घरात प्रवेश करतील, त्याच दिवशी अन्नग्रहण करेन, अशी शपथ त्यांनी घेतली. ते एक पान दुकान चालवत आपला उदरनिर्वाह करीत आहेत. झमेली बाबा अविवाहत असून, माझे आयुष्य समाजासाठी समर्पित असल्याचे ते सांगतात.
अयोध्येतील एका फोटो स्टुडिओत त्यांनी फोटो काढला. यावेळी स्टुडिओ मालकाने त्यांना नाव आणि पत्ता विचारत फोटो पोस्टाने पाठवतो असे सांगितले. काही दिवसांनी त्यांना अयोध्येतील राम मंदिर आंदोलनावेळी काढलेला फोटो मिळाला. त्यांनी हा फोटो आजही जतन केल्याचे ते सांगतात. आता २२ जानेवारी रोजी झमेली बाबा यांचे राम मंदिराचे स्वप्न वास्तवात उतरणार आहे. त्या दिवशी ते तब्बल ३१ वर्षानंतर अन्नग्रहण करणार असून, त्यांच्या अनोख्या उपवास हा चर्चेचा विषय ठरला आहे.