किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलरांची, (०८ फेब्रुवारी) – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा सदस्य धीरज प्रसाद साहू यांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी गुरुवारी दिली.
साहू यांच्या मालकीच्या ओडिशातील बौद्ध डिस्टिलरीज प्रा. लि. वर आयकर विभागाने डिसेंबर महिन्यात छापेमारी करून आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३५१.८ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर ते चर्चेत आले होते. हेमंत सोरेन यांच्यासोबतचे संबंध आणि सोरेन यांच्या दिल्लीतील घरातून जप्त करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू एसयूव्हीसोबतच्या संबंधाची चौकशी करून ईडी त्यांचे बयाण नोंदवून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हरयाणाची नंबर प्लेट असलेल्या या एसयूव्हीच्या नोंदणीत असलेल्या गुरुग‘ाममधील कारदारपूर येथे बुधवारी ईडीने छापेमारी केली. या व्यतिरिक्त कोलकाता येथेही दोन ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. धीरज साहू या वाहनाचे बेनामी मालक असल्याचा संशय ईडीला आहे.