Posted by वृत्तभारती
Monday, December 21st, 2015
=जेटलींचे बँकांना निर्देश= चेन्नई, [२० डिसेंबर] – राजधानी चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांत कोसळलेला पाऊस अभूतपूर्वच होता, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले असून, प्रत्येक पीडिताच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील हे सुनिश्चित करा, असे निर्देश त्यांनी बँकांना दिले आहेत. पीडित लोकांना मदत पुरवणे हे पहिले मोठे आव्हान आहे. शहर आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत असताना माझा हा दौरा आहे. या पावसाने जे नुकसान केले त्याचा मुकाबला करणे...
21 Dec 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 30th, 2015
=२८ वर्षांच्या प्रीतीला मिळाला चालकाचा मान= चेन्नई, [२९ जून] – तामिळनाडूची राजधानी चेन्नई येते आज सोमवारपासून मेट्रोसेवा सुरू झाली. मुख्यमंत्री जयललिता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सेवेचे उद्घाटन केले. यासोबतच मेट्रोसेवा असलेले चेन्नई देशातील सहावे शहर बनले आहे. विशेष म्हणजे २८ वर्षीय अभियंता प्रीतीला शहरातील पहिली मेट्रो चालविण्याचा बहुमान मिळाला. चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग दहा किलोमीटरचा असून, या मार्गावर एकूण ७ स्थानके आहेत. हे अंतर पार करण्यासाठी मेट्रोला १८...
30 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, May 24th, 2015
=जयललिता यांचा थाटात शपथविधी, राज्यभर प्रचंड जल्लोष= चेन्नई, [२३ मे] – बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता आज शनिवारी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित एका शानदार समारंभात राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सुरू असताना संपूर्ण तामिळनाडूत अण्णाद्रमुक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक प्रचंड जल्लोष करीत होते. जयललिता यांच्यासोबतच २८ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे,...
24 May 2015 / No Comment / Read More »