किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशबंगळुरू, (१० नोव्हेंबर) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये भाजपा खासदार तेजस्वी सूर्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या भेटीने खळबळ उडाली आहे. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कर्नाटकात ‘खेला’ होणार आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे.
या वर्षीच कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. मात्र, कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयात सिंहाचा वाटा असलेले शिवकुमार या निर्णयामुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवाय ते लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मध्यंतरी कुमारस्वामी यांनीही डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार असतील, तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे म्हणून काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडवून दिली होती. त्यात आता भाजपा खासदार तेजस्वी सूर्या आणि शिवकुमार यांची भेट झाल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
सोशल मीडियावर लोक या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, प्रकरण मिटले आहे. शिवकुमार लोकसभेनंतर मुख्यमंत्री होत आहेत. सूर्याभाई मोटा भाईंचा मेसेज घेऊन गेले होते. तर दुस-याने लिहिले की, कर्नाटकातील सरकार पडणार असल्याचे दिसते. आणखी एका यूजरने लिहिले की, सिद्धरामय्या यांचा काळ संपत आला आहे आणि कर्नाटकात पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे.