किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – दिल्लीतील भाजप कार्यालयात आज गुरुवारी उशिरापर्यंत तेलंगणा निवडणुकीवर विचारमंथन झाल्यानंतर पक्षाने आता आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी ३५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याआधी भाजपने दोन याद्या जाहीर केल्या आहेत. तिसरी यादी आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीत ५२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती, तर दुसर्या यादीत केवळ एका नावाची घोषणा करण्यात आली होती. आता ३५ जणांची तिकिटे फायनल झाली आहेत.
तेलंगणा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार्या भाजपने तिसर्या यादीत मेडकमधून पंजा विजय कुमार यांना उमेदवारी दिली आहे. उप्पल मतदारसंघातून पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष एव्हीएसएस परबखर यांना उमेदवारी दिली आहे. एव्हीएसएस २०१४ ते २०१८ पर्यंत या जागेवरून आमदार राहिले आहेत. भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पुसा राजू यांना पक्षाने मुर्शिदाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ज्युबली हिल्समधून काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या विरोधात भाजपने लंकाला दीपक रेड्डी यांना आपला चेहरा बनवला आहे. त्याचप्रमाणे पक्षाने नारायणपेटमधून आर पांडू रेड्डी, नलगोंडामधून एम श्रीनिवास गौड, अंबरपेटमधून कृष्णा यादव, परकलमधून पी काली प्रसाद राव आणि शादनगरमधून आंदे बबिहा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
आतापर्यंत ८८ उमेदवारांची घोषणा
भाजपने आतापर्यंत एकूण ११९ जागांपैकी ८८ उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत ५२, दुसर्या यादीत फक्त एक आणि तिसर्या यादीत ३५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तेलंगणाच्या निवडणुका यावेळी खूपच रंजक दिसत आहेत. राज्यात बीआरएस, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत आहे. राज्यात ३० नोव्हेंबरला मतदान होणार असून, त्याचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.