किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१ मार्च) – तेलंगणा विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा युद्धपातळीवर कामाला लागला असून, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तेलंगणा प्रदेश भाजपा अध्यक्ष बी. संजय, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, डी. के. अरुणा, अरविंद धरमपुरी, सुधाकर रेड्डी, के. लक्ष्मण, विजयशांती, विवेक वेंकटस्वामी, एटाला राजेंद्रन् आणि मुरलीधरराव आदी नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील भाजपाच्या व्यूहरचनेबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
प्रदेश भाजपा अध्यक्ष बी. संजय यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे; मात्र राज्यातील विधानसभा निवडणूक लक्षात घेता त्याच्या अध्यक्षपदाला मुदतवाढ मिळू शकते. संजय यांच्या नेतृत्वात भाजपाने राज्यात प्रजासंग्राम यात्रा काढली. या यात्रेदरम्यान राज्यात लहानमोठ्या अशा ११ हजार सभा घेण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय यांच्या या जनसंपर्क अभियानाचे कौतुक केले. अन्य राज्यांनीही यापासून धडा घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मागील वर्षी हैदराबाद येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. यावर्षीच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. के. चंद्रशेखर राव सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री असून, राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याच्या दृष्टीने त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असे केले आहे. तेलंगणात दहा वर्षांपासून तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे.