किमान तापमान : 28.18° से.
कमाल तापमान : 29.39° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 35 %
वायू वेग : 2.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.39° से.
24.78°से. - 29.99°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.19°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.71°से. - 28.37°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.31°से. - 28.43°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.48°से. - 27.57°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.34°से. - 27.92°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (१० मार्च) – बंगळुरूतील इयत्ता नववीच्या एका विद्यार्थ्याने कागदांची नासाडी थांबविण्यासाठी केलेल्या प्रयोगाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. आदित्य दीपक अवधानी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो बंगळुरूमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांचा मुलगा आहे.
माझा मुलगा प्रत्येक शैक्षणिक वर्षानंतर त्याच्या वह्यांमध्ये शिल्लक राहिलेले कोरे कागद काढतो व ते बाईंड करतो. या कागदांपासून तयार केलेल्या वहीचा तो ‘रफ कॉपी’ म्हणून वापर करतो, असे ट्विट डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी केले होते. या ट्विटसोबत त्यांनी डेस्कवर ठेवलेल्या कागदांच्या गठ्ठ्याचे छायाचित्रही सामायिक केले होते. या ट्विटची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा दखल घेतली. ‘शाश्वत जीवनाचा एक चांगला संदेश देण्याचा हा एक उत्कृष्ट सांघिक प्रयत्न आहे. तुमचे व तुमच्या मुलाचे अभिनंदन. इतरांनीही असेच प्रयत्न शेअर केले पाहिजेत, ज्यामुळे पुनर्वापर आणि ‘संपत्तीचा अपव्यय’ याबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आदित्यचे कौतुक केले.
माझ्या आई-वडिलांनी मला लहानपणी ही सवय लावली होती. मीसुद्धा माझ्या मुलाला प्राथमिक वर्गात असल्यापासून ही सवय लावली, असे आदित्यची आई वर्षा रघुरामन म्हणाल्या. डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांची रिसायकलिंग पेपरवरील पोस्ट पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिक्रियेनंतर आणखी सामायिक झाली आहे. अनेक वापरकर्त्यांनी आदित्यच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. पीएम मोदींच्या रिट्विटवर एका वापरकर्त्यांनी कमेंट केली की, ‘मी माझ्या मुलींच्या नोटबुक व पेपर्सबाबतही असेच काहीसे करतो. त्यांना बाईंड नाही केले पण, रफ ड्राफ्ट व डूडलिंग इत्यादींसाठी त्यांचा वापर होतो.’