किमान तापमान : 28.53° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 29 %
वायू वेग : 1.7 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
24°से. - 30.99°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (१० मार्च) – माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियो यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणात राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनीष सिसोदिया यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. दिल्ली न्यायालयाने अबकारी धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २१ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. मनीष सिसोदिया यांची ईडीने तिहार तुरुंगातील बॅरेक क्रमांक १ मध्ये चौकशी करून अटक केली होती. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने मनीष सिसोदिया यांच्या प्रॉडक्शन वॉरंटसाठी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात अर्ज केला.
या अर्जावर सुनावणी करताना राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी सकाळी सांगितले की, मनीष सिसोदिया यांना दुपारी २ वाजता कोर्टात हजर करावे. दरम्यान, ईडीच्या कोठडीच्या याचिकेवर विचार केला जाणार आहे. दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर आणि त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. भाजपने शुक्रवारी सत्ताधारी पक्षाचे आणखी एक पोस्टर जारी केले. दिल्ली भाजपने आपल्या ट्विटर पेजवर सिसोदिया आणि जैन यांच्या चेहर्यांसह ’जोडी नंबर १’ नावाचे पोस्टर शेअर केले आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केलेल्या अटकेनंतर राजीनामा दिला. त्याचवेळी माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना गेल्या मे महिन्यात मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली होती आणि त्यांनीही सिसोदिया यांच्यानंतर राजीनामा दिला होता. दोन्ही नेते सध्या तिहार तुरुंगात आहेत.