किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशस्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३३४ पैकी ३२९ जागा ताब्यात, तृणमूल, माकपाला जबर हादरा,
आगरतळा, २८ नोव्हेंबर – त्रिपुरातील सत्ताधारी भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस आणि माकपाला जबर हादरा देत आगरतळा महापालिका आणि १३ स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३३४ पैकी ३२९ जागा भाजपाने ताब्यात घेतल्या आहेत. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे अभिनंदन केले आहे.
५१ सदस्य संख्या असलेल्या आगरतळा महापालिकेतील एकही जागा विरोधक जिंकू शकले नाहीत. या निवडणुकीत भाजपाचे जबरदस्त वर्चस्व राहिले. १५ सदस्य संख्येची खोवाई नगरपरिषद, १७ सदस्य संख्येती बेलोनिया नगरपरिषद, १५ सदस्य संख्येची कुमारघाट नगरपरिषद आणि ९ सदस्य संख्येच्या सबरूम नगर पंचायतीच्या सर्वच प्रभागांमध्ये भाजपाने विजय मिळवला, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी दिली.
धर्मनगर नगरपरिषद, तेलियामुरा नगरपरिषद आणि अमरपूर नगर पंचायतीतही भाजपाने बहुमत मिळवले आहे. सोनामुरा नगर पंचायत आणि मेलाघर नगर पंचायतीतील १३ जागांवर भाजपाने बिनविरोध विजय मिळवला. जिरानिया नगर पंचायतीत ११ जागा भाजपाने जिंकल्या आहेत.
अंबासा नगरपरिषदेच्या १२ जागा भाजपाने जिंकल्या तर, तृणमूल कॉंग्रेस आणि माकपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकला. कैलाशहर नगरपरिषदेच्या १६ जागा भाजपाने जिंकल्या तर, माकपाला एक जागा मिळाली. पाणीसागर नगर पंचायतीत भाजपाने १२ जागांवर तर, माकपाने एक जागा जिंकली.
तृणमूल कॉंग्रेसला केवळ एक जागा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. तर कित्येक दशके त्रिपुरावर राज्य करणार्या माकपाला तीन जागा जिंकता आल्या.