किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशसर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल,
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर – दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पृष्ठभूमीवर बांधकामांवर बंदी घालण्यात आली असताना केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार्या सेंट्रल व्हिस्टाचे काम कसे सुरू आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचिकाकर्त्यांचे वकील विकास सिंह यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. नागरिकांच्या जीवापेक्षा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प सरकारसाठी जास्त महत्त्वाचा आहे का, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. या प्रकल्पामुळेही धुळीचे प्रमाण वाढत असल्याचे पुरावे सादर करता येऊ शकतात, असेही सांगण्यात आले.
यावर न्यायालयाने म्हटले की, आदेश काय द्यावा, हे तुम्ही सांगू नये. दिल्लीतील वायू प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. यावर नियंत्रण कसे मिळवता येईल, यावर अधिक विचार होणे आवश्यक आहे. मात्र, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामाबाबत केंद्र सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.