किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशसत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका : मोदी,
नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर – मला सत्ता नको, सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका, मला केवळ सेवेकरी व्हायचे आहे. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची माझी इच्छा नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले.
आकाशवाणीवरून प्रसारित होणार्या ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील नागरिकांसाठी प्रधान सेवक होऊन काम करणे, हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे माझ्या सरकारचे धोरण आहे. भारताची स्टार्ट अप व्यवस्था जागतिक समस्यांवर तोडगा काढणारी सिद्ध झाली आहे. आज लहान खेडेगावातील नागरिकही स्थानिक समस्या सोडविण्यासाठी एकत्र येत असतात.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या संभाव्य धोक्यापासून नागरिकांना सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
आयुष्मान भारत योजनेमुळे देशातील असंख्य लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल झालेला आहे. आम्ही जेव्हा याविषयी ऐकतो, तेव्हा मन आनंदी होते. जनतेसाठी आणखी काही करण्याची इच्छा होते. त्यासाठी नवनव्या योजना मनात येतात आणि त्या अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. सत्ता हे सेवेचे माध्यम असले, तरी मला सत्ताधारी नाही, तर सेवेकरी म्हणून राहायला आवडते, असे त्यांनी सांगितले.
अमृतमहोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो. आता तर देशभरातील सामान्य जनता असो, वा सरकारे असो, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचा गाजावाजा सुरू आहे.
नैसर्गिक स्रोतांचे जतन करा
आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत, ते आपण जपले पाहिजे, त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणले पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे आणि जगाचे हित आहे. जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो, त्या बदल्यात निसर्गही आपले संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान करतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.
झाशीच्या राणीचे ऑस्ट्रेलियाशी नाते
झाशीची राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या, तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते, पण भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे, असे मोदींनी सांगितले.