किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, २८ नोव्हेंबर – संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होणार असून, पेगासस, महागाई आणि इतर अनेक मुद्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे.
तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्षभरापासून काही संघटना आंदोलन करीत आहेत. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्यांचा लहान गट आंदोलन करीत असला तरी, सर्वंकष विकासासाठी सर्वांना सोबत घेणे ही काळाची गरज असल्याचे या विधेयकात म्हटले आहे. सोमवारी सभागृहात हजर राहण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि विरोधी कॉंग्रेसने आपल्या खासदारांसाठी व्हिप बजावला आहे. शेतकर्यांच्या दुरवस्थेसह त्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याच्या मागणीबाबत विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांबाबत शोक प्रस्ताव घेण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.
पेगासस, वाढत्या महागाईवर चर्चा करा ः विरोधक
केंद्र सरकारने आज रविवारी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पेगासस, वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सरकारच्या वतीने राजनाथसिंह आणि पीयूष गोयल बैठकीसाठी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीसाठी उपस्थित नसल्याबद्दल कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित केला. बंगालसह सीमावर्ती राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या विस्तारित अधिकार क्षेत्राचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय आणि डेरेक ओ’ब्रायन यांनी किमान हमीभाव आणि फायद्यातील सार्वजनिक कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीवरील कायदे आणण्याचा मुद्दा उपस्थित केला.