किमान तापमान : 28.93° से.
कमाल तापमान : 29.64° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.64° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, २८ नोव्हेंबर – पूर्व दिल्ली मतदारसंघातील भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला इसिस काश्मीर या संघटनेच्या ई-मेलवरून तिसर्यांना धमकी मिळाली आहे. दिल्ली पोलिस आणि आयपीएस श्वेता आमचे काहीच करू शकत नाही, दिल्ली पोलिसांत आमचे खबरे आहेत आणि आम्ही तुमच्याबद्दल सर्व माहिती घेत आहोत, असे या मेलमध्ये म्हटले आहे.
गौतम गंभीरला आठवडाभरात मिळालेली ही तिसरी धमकी आहे. याआधी गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मेलद्वारे देण्यात आल्या होत्या.
२३ नोव्हेंबरच्या रात्री गौतम गंभीरला पहिला ई-मेल आला, ज्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत गंभीरने तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती. २४ तारखेला पुन्हा एक ई-मेल आला, ज्यामध्ये काल तुम्हाला मारायचे होते, पण वाचलास, काश्मीरपासून दूर राहा, असे लिहिले होते. या मेलसोबत गंभीरच्या घराबाहेरचा एक व्हिडीओही पाठवण्यात आला होता. ही धमकी त्याला इसिस काश्मीरने दिल्याचा आरोप आहे.
गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आल्याचे तपासत समोर आले आहे. गंभीरने आरोप केला होता की, त्याला इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मात्र, ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला, त्याचा आयपी ऍड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गंभीरला धमकीचा ई-मेल पाकिस्तानमधून आला होता. त्यात पाकिस्तानचा आयपी ऍड्रेसही सापडला आहे.