किमान तापमान : 28.93° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, २७ नोव्हेंबर – ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याबाबत फेरविचार करावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आढावा बैठकीत केली आहे.
कोरोना स्थितीवरील आढावा बैठकीत सहभागी झालेल्या अधिकार्यांनी जगभरात असलेल्या कोरोनास्थितीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली, तसेच कोरोना महामारी सुरू झाल्यापासून जगभरातील कित्येक देशांमध्ये संसर्गाते प्रमाण वाढत असल्याचे सांगितले, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.
जगभरात चिंतेचे कारण ठरलेल्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटची माहिती, त्याची वैशिष्ट्ये आणि विविध देशांवर झालेल्या परिणामांबाबत अधिकार्यांनी नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. या व्हेरिएंटचे भारतावर होणार्या परिणामांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. नवीन व्हेरिएंटबाबत सजग राहणे आवश्यक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सांगितले. नवीन धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक सजग राहणे आवश्यक असून, मुखाच्छादन घालणे, भौतिक दूरतेच्या निकषाचे पालन करण्यासारखी त्यांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत कॅबिनेट सचिव राजीव गौबा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
धोकादायक देशांवर लक्ष केंद्रित करा
देशात दाखल होणार्या विदेशी प्रवाशांवर नजर ठेवणे, दिशानिर्देशांप्रमाणे त्यांच्या चाचण्या घेणे आणि धोकादायक देशांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी सांगितले. ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट समोर आल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याच्या योजनेचा आढावा घेण्यात यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.