किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.8° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.8° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, २७ नोव्हेंबर – भारतीय रिझर्व्ह बँकेने नियामकांचे पालन न केल्यामुळे भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एक निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली.
आर्थिक स्थिती संदर्भात ३१ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळात स्टेट बँकेच्या देखरेख मूल्यांकनावर वैधानिक निरीक्षण करण्यात आले. जोखीम मूल्यांकन तपासणी अहवालात बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करण्यात आल्याचे आढळले. स्टेट बँकेने कर्जदार कंपन्यांबाबत कंपन्यांच्या पेड-अप भाग भांडवलाच्या ३० टक्क्यांहून अधिक रकमेचे शेअर्स तारण ठेवले होते. यानंतर आरबीआयने याप्रकरणी स्टेट बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेने सादर केलेल्या उत्तराचा अभ्यास करून एक कोटीचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्राने दिली.
रिझर्व्ह बँकेने दोन पेमेंट सिस्टिम ऑपरेटर्सनाही दंड ठोठावला आहे. हे ऑपरेटर्स टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स आणि ऍपनीट टेक्नॉलॉजीज आहेत. टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्सवर व्हाईट लेबल एटीएम बसवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल एक कोटीचा दंड ठोठावण्यात आला, तर ऍपनीट टेक्नॉलॉजीजने रिझर्व्ह बँकेच्या खात्यातील शिल्लक आणि निव्वळ मूल्याच्या गरजेची देखभाल करण्याबाबतच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.