किमान तापमान : 27.78° से.
कमाल तापमान : 27.92° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.92° से.
27.65°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, २७ नोव्हेंबर – संसद भवनाला घेराव घालून त्यावर खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट प्रतिबंधित संघटना शीख फॉर जस्टिसने (एसएफजे) रचला आहे, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी अलिकडेच दिला आहे. एसएफजेचा अतिरेकी गुरुपत्वंतसिंग पन्नूने यूट्यूब चॅनलवर एक चित्रफीत जारी केली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान २९ नोव्हेंबर रोजी संसदेला घेराव घालून त्यावर खलिस्तानी झेंडा फडकवावा, असे आवाहन त्याने कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणार्या संघटनांना केले असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी अहवालात म्हटले आहे.
संसद भवनावर खलिस्तानी झेंडा फडकावणार्याला सव्वा लाख अमेरिकी डॉलर्स बक्षीस दिले जाईल, असेही पन्नूने या चित्रफितीत म्हटले आहे. दिल्ली पोलिसांसह सर्वच यंत्रणांना गुप्तचर संस्थांनी सतर्कतेचा इशारा दिला असून, संसद भवनाजवळ सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात यावा, असे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनातील सहभागींना भडकवले जाईल, असे एसएफजेने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. प्रजासत्ताक दिनाला लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावणार्याला अडीच लाख अमेरिकी डॉलर्सचे बक्षीस देण्याची घोषणाही या संघटनेने मागील वर्षी केली होती.
एसएफजेसह इतर खलिस्तानी संघटना आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या स्वयंसेवी संघटनांना मिळत असलेल्या निधीवर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएची नजर आहे. या संघटनांवर लगाम घालण्यासाठी एनआयएचे पथक अलिकडेच कॅनडाला गेले होते. महानिरीक्षक पातळीवरील अधिकार्याने या पथकाचे नेतृत्व केले होते.