किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.96°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, २७ नोव्हेंबर – डिझेल वाहनांची निर्मिती बंद करण्याचा निर्णय देशातील सर्वांत मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने घेतला आहे. येत्या काही वर्षांत येणार्या उत्सर्जन नियमांच्या पुढील टप्प्यांमुळे डिझेल वाहनांच्या किमतीत वाढ होईल. त्याचा परिणाम डिझेल वाहनांच्या विक्रीवर होईल. त्यामुळे डिझेल वाहनांची निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मारुती सुझुकीने सांगितले. मागील काही वर्षांपासून पेट्रोल वाहनांमध्ये हळूहळू बदल दिसून आला आहे.
२०२३ मधील उत्सर्जन नियमांच्या पुढील टप्प्यात डिझेल वाहनांची विक्री आणखी कमी होईल, असा विश्वास कंपनीला आहे. त्यामुळे मारुती सुझुकी इंडियाने डिझेल सेगमेंटमध्ये परतण्याची शक्यता फेटाळली आहे, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
आम्ही डिझेल वाहनांचे उत्पादन घेणार नाही. आधी याचा अभ्यास करू आणि ग्राहकांची मागणी असल्यास आम्ही या सेगमेंटमध्ये परतू, असे आम्ही यापूर्वीच सूचित केले होते. परंतु, आता आम्ही डिझेल सेगमेंटमध्ये परतणार नाही, असे कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी सी. व्ही. रमण यांनी सांगितले. २०२३ मध्ये येणार्या उत्सर्जन नियमांच्या पुढच्या टप्प्यात डिझेल वाहनांची विक्री कमी होईल. मागील काही वर्षांत ग्राहकांचा कल पेट्रोल वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे येत्या काळात डिझेल सेगमेंटमध्ये उतरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.