किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, २६ नोव्हेंबर – जागतिक बाजारातील मंदी आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू प्रकार आढळल्याच्या वृत्ताने आज शुक्रवारी केवळ भारतच नव्हे तर जगभरातील भांडवली बाजारात भीषण पडझड झाली. मुंबई बाजारातील निर्देशांकात विक्रमी १६८८ अंकांची तर राष्ट्रीय बाजारातील निफ्टीत ५०९ अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळे अवघ्या दोन तासात गुंतवणूकदारांचे सुमारे सहा लाख कोटींहून अधिकचे नुकसान झाले.
३० शेअर्सवर आधारित मुंबई बाजाराच्या निर्देशांकात दिवसाच्या सुरुवातीपासूनच विक्रीचा विक्रमी दबाव दिसून आला. आशियातील शांघाय, टोकियो, हॉंगकॉंग तसेच सिडनी बाजारातही मंदीचे सावट होते.
दक्षिण आफ्रिकेत तसेच युरोपच्या काही भागात कोरोनाचा नवा विषाणू प्रकार आढळून आल्याची बातमी शुक्रवारी जगभरातील भांडवली बाजारांसाठी मारक ठरली. यातूनच विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि बड्या कंपन्यांच्या शेअर्सची झपाट्याने विक्री झाली. यातून दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक १६८७.९४ अंकांनी घसरून बंद झाला. तो ५७,१०७.१५ वर बंद झाला. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीत ५०९.८० अंकांची घसरण झाली आणि तो १७,०२६.४५ वर बंद झाला.
इंडसइंड बँकेचे शेअर्स आज सर्वाधिक तोट्यात राहिले. त्यात सहा टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ मारुती, टाटा स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि टायटन यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे या मंदीच्या प्रचंड वादळातही डॉ. रेड्डीज आणि नेस्ले हे शेअर्स फायद्यात राहिले.
आतापर्यंतच्या काही प्रमुख घसरणी
कोसळण्याची तारीख मुख्य कारण प्रमाण (अंकात)
२४ ऑक्टोबर २००८ अमेरिकेतील आर्थिक संकट १०७०.००
२४ ऑगस्ट २०१५ जागतिक बाजारातील मंदी १६२४.००
९ नोव्हेंबर २०१६ नोटबंदी १६८९.००
१२ मार्च २०२० कोरोनाचा कहर २९१९.२६
१६ मार्च २०२० कोरोनाचा प्रादुर्भाव २७१३.४१
२३ मार्च २०२० देशव्यापी टाळेबंदी ३९४३.७२