किमान तापमान : 28.47° से.
कमाल तापमान : 29.43° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.47° से.
27.77°से. - 29.35°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार हल्ला,
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर – घराणेशाहीला सर्वोच्च समजणारे राजकीय पक्ष देशासाठी आणि पर्यायाने लोकशाहीसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरले आहेत. ही घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी कॉंगे्रससह घराणेशाहीला सर्वोच्च मानणार्या काही राजकीय पक्षांवर जोरदार हल्ला चढविला.
एका पक्षाचा कारभार पिढ्यान्पिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहाणे लोकशाहीच्या विरोधात आहे. ज्यांनी लोकशाही मूल्ये गमावली आहेत, ते लोकशाहीचे संरक्षण कसे करू शकतील, असा सवाल पंतप्रधानांनी केला. संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे वाटचाल करीत आहे, जे संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह काही राजकीय पक्षांचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन केले. आज काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत एक समस्या पाहायला मिळत आहे. घराणेशाहीत वावरणारे पक्ष देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. कौटुंबिक पक्ष म्हणजे असे पक्ष ज्यांचे नियंत्रण वर्षानुवर्ष, पिढ्यान्पिढ्या एकाच कुटुंबाशी संबंधित लोकांच्या हातात आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी कॉंग्रेसचे नाव न घेता परिवारवादी पक्षांवर हल्ला चढवला.
विरोधकांचा बहिष्कार
कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. मात्र, या पक्षांनी बहिष्काराचे कोणतेही कारण दिले नाही. संविधान दिनाचा आजचा कार्यक्रम मोदी सरकारने किंवा पंतप्रधान मोदी यांनी आयोजित केला नव्हता; तर लोकसभेच्या सभापतींनी आयोजित केला होता, असे स्पष्ट करताना त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपेक्षा आणखी पवित्र प्रसंग काय असू शकेल? डॉ. आंबेडकरांनी देशाला जी महान भेट दिली, त्याला आपण नेहमीच एक स्मृती ग्रंथ म्हणून स्मरणात ठेवतो. हा दिवस या सदनाला प्रणाम करण्याचा दिवस आहे, असे सांगताना पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकरांना नमन केले.
२६/११ रोजीचा हल्ला परतवून लावण्यासाठी आणि असंख्य नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी वीरमरण पत्करणार्या जवानांना हा देश कधीच विसरू शकत नाही. देश त्यांचा नेहमीच ऋणी राहील.’’
२६/११ च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मुंबईवर झालेल्या २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. आज आपल्यासाठी दु:खद दिवसही आहे. आजच्याच दिवशी देशाच्या शत्रूंनी मुंबईत दहशतवादी हल्ला केला होता. देशाच्या वीर जवानांनी दहशतवाद्यांचा सामना केला. या हल्ल्यात प्राणाहुती देणार्या जवानांना आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ते म्हणाले.
-रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. आपली राज्यघटना हा लोकशाहीचा आत्मा आहे, देशाची एकता आणि प्रगतीचा पाया आहे. घटनेच्या शिल्पकारांना माझे नमन.
-अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री