किमान तापमान : 29.43° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 1.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.63°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, २६ नोव्हेंबर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बडे नेते आज शुक्रवारी धावपळ करीत दिल्लीत पोहोचले. या नेत्यांच्या दिल्लीवारीने आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये राज्यातील सत्तांतराचे संकेत दिल्याने राज्य तसेच केंद्रातील राजकीय वर्तुळात आजचा शुक्रवार अस्वस्थ करणारा ठरला.
महाराष्ट्रातील आगामी काळात होऊ घातलेल्या राजकीय स्थित्यंतराची मुळे या नेत्यांच्या दिल्लीवारीत तर दडलेली नाहीत ना, या विचाराने राज्यातील नेतेही तर्कवितर्कांमध्ये गुंतले होते.
देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतंत्रपणे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याशिवाय शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलही मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीत पोहोचले. पवार आणि फडणवीसांसारखे नेते एकाचवेळी कोणतेही कारण न देता राजधानीत आल्याने चर्चेला नुसते उधाण आले होते. भाजपा आणि राकॉंचे नेते या दिल्लीभेटीला राजकीय आयाम नसल्याचे स्पष्टीकरण देत राहिले. मात्र, राजकीय विश्लेषकांसह कोणीही यावर पूर्ण सहमत होण्यास तयार नव्हते.