किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.3°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलपाच तासांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान,
नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर – भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली आहे. मात्र, पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्र भाजपामधील संघटनात्मक फेरबदलावरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे सांगितले जात आहे.
देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी त्यांनी भाजपाचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नेते बी. एल. संतोष व सी. टी. रवी यांची भाजपा मुख्यालयात भेट घेतली. या नेत्यांमध्ये सुमारे पाच तास चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
माझ्या दिल्लीवारीनंतर कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आले, याची मला कल्पना नाही. मी येथे संघटनात्मक बैठकीसाठी आलो होतो. चंद्रकांतदादा आणि मी सी. टी. रवी तसेच बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली. संघटनेची पुढची वाटचाल आणि त्याचा आढावा यावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीत वेगळा अजेंडा नव्हता, असे ते म्हणाले. अमित शाह आमचे नेते आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांची भेट घेतोच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राणे काय म्हणाले माहिती नाही
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आले असता, मला त्याची माहिती नाही. यावेळी त्यांनी नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केले. कॉंग्रेसला अपेक्षा आहे की, ते चमत्कार घडवतील, पण काहीही चमत्कार होणार नाही. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेच निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.