किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलअयोध्या, (३१ जानेवारी) – सीतेची नगरी नेपाळ आणि रामाची नगरी अयोध्या यांच्यातील संबंध त्रेतायुगापासून सर्वश्रुत आहे. माता जानकी त्रेतायुगात जनकपूर (सध्याचे नेपाळ) येथून अयोध्येला आल्या. आता कलियुगात रामाच्या मूर्तीसाठी माता जानकी नगरातून शालिग्राम शिळा आणली जात आहेत. २ फेब्रुवारीला हे शिळा अयोध्येत पोहोचतील. त्याचवेळी या दगडांपासून रामललाची मूर्ती बनवायची की नाही यावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट विचार करत आहे. पण, या दगडांपासून मूर्ती घडवल्यास अयोध्या आणि जनकपूरचे नाते पुन्हा एकदा ताजेतवाने होईल. मात्र, नेपाळच्या गंडकी नदीचे शालिग्राम शिळा दोन ट्रकने अयोध्येत आणले जात आहेत. वाटेत ठिकठिकाणी रामभक्त या शिळाची पूजा करत आहेत.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याबाबत सांगितले की, नेपाळच्या काली गंडकी नदीतून शिळा आणली जात आहेत. हि शिळा विकत घेतली नसून नेपाळच्या संतांनी सांगितले की, त्यांना ही शिळा अयोध्येला भेट द्यायची आहे. एकदा जनकपूरने माता जानकीला भगवान श्रीरामांच्या स्वाधीन केले होते, आता ही भेट हुंड्याच्या रूपात दिली जात आहे. तसेच चंपत राय यांनी सांगितले की, जनकपूरच्या जानकी मंदिराचे महंत राम तपेश्वर महाराज यांनी नेपाळ सरकारला ही शिळा अयोध्येला पाठवण्याची विनंती केली होती, जी नेपाळ सरकारने मान्य केली. सरकारने गंडकी नदीतून हि शालिग्राम शिळा जी ६० दशलक्ष वर्षे जुनी आहे ती अयोध्येतील संतांना सादर करणार आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, जेव्हा दगड अयोध्येला पोहोचेल आणि शिल्पकारांना दाखवला जाईल, तेव्हाच हे दगड कोरले जाऊ शकतात की नाही हे तेच सांगतील. त्यानंतरच प्रकरण पुढे सरकेल. चंपत राय यांनी सांगितले की, भारतात जिथे जिथे या प्रकारचे दगड उपलब्ध आहेत, तिथे ते सर्व दगड खरेदी केले जात आहेत. जो दगड एकदा आणला, त्याच दगडाने रामललाची मूर्ती बनवायची गरज नाही.