किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल-भाजपा आमदाराचा गंभीर आरोप,
बंगळुरू, (३० जानेवारी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याजवळ स्वपक्षातील नेत्यांसह १२० लोकांचे अश्लील छायाचित्रण असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार रमेश जारकीहोली यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
काँग्रेस नेते शिवकुमार यांच्याजवळ काँग्रेस नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ नेते आणि अधिकार्यांचे अश्लील छायाचित्रण आहेत. याद्वारे त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग करण्यात येत आहे. काही काँग्रेस नेते, वरिष्ठ अधिकार्यांसह अन्य लोक त्यांच्या अश्लीलतेच्या जाळ्यात (हनी ट्रॅप) अडकले आहेत, असे आमदार रमेश जारकीहोली यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. शिवकुमार आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बलकर यांच्यामुळे आपले खाजगी संबंध खराब झाले असून, शिवकुमार यांनी महिलेल्या माध्यमातून आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडविल्याचा आरोपही जारकीहोली यांनी लावला आहे.
प्रकरण असे …
दोन वर्षांअगोदर अश्लील सीडी प्रकरण समोर आल्यानंतर भाजपा नेते रमेश जारकीहोली यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनातून आपले शोषण केल्याचा आरोप संबंधित महिलेने त्यांच्यावर केला होता. आता जारकीकोली यांनी या प्रकरणामागे डी. के. शिवकुमार यांचे कारस्थान असून, सीबीआयने चौकशी करण्याची मागणीही केली आहे.