किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशउच्च न्यायालयाचा निर्वाळा,
चेन्नई, २६ नोव्हेंबर – एका धर्मातून दुसर्या धर्मात प्रवेश केल्यानंतरही व्यक्तीची जात कायम राहते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाशी निगडित एका प्रकरणाच्या सुनावणीत केली आहे.
संबंधित प्रकरणात एका व्यक्तीने धर्मांतर करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. या व्यक्तीचा विवाह दलित समाजातील एका तरुणीसोबत झाला; मात्र त्याच्या पत्नीने धर्मांतर केले नाही. आपला विवाह आंतरजातीय अर्थात् ‘इंटरकास्ट मॅरेज’ असल्याचे सांगत आपल्याला सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळावा, असा दावा या व्यक्तीने न्यायालयात याचिकेद्वारे केला होता.
यावर सुनावणी करताना उच्च न्याललायाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. व्यक्तीने धर्मांतर केले तर कायद्यानुसार आरक्षणासाठी त्याला मागासवर्गीय मानले जाते, अनुसूचित जातीत त्याची गणती होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारी व्यक्ती आदि-द्रविड समाजाशी संबंधित होती. हा समाज अनुसूचित जातीत येतो. मात्र, या व्यक्तीने धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे त्याला मागासवर्गीय हा दर्जा मिळाला.
२००९ मध्ये या व्यक्तीने अरुन्थातियार समाजाशी संबंधित मुलीसोबत विवाह केला. त्याची पत्नी अनुसूचित जाती समाजाशी संबंधित आहे. विवाहानंतर तिने धर्मांतर केले नाही. विवाहानंतर व्यक्तीने आंतरजातीय विवाह प्रमाणपत्राची मागणी करीत, सलेम जिल्हा न्यायालयाकडे याचिका दाखल केली.
आपला विवाह हा मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती यांचा मेळ असल्याने, आपल्याला आंतरजातीय विवाहाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीतील आंतरजातीय विवाहांना सूरतमध्ये सरकारी नोकर्यांत प्राधान्य दिले जाते. याच आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी व्यक्तीने न्यायालयात दावा दाखल केला. २०१५ मध्ये सलेम जिल्हा न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला व्यक्तीने मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर, न्या. एस. एम. सुब्रमण्यम् यांनी सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. धर्म बदलल्याने कोणताही दलित व्यक्ती मागासवर्गीय समजला जातो. परंतु, अशा व्यक्तीने दलित व्यक्तीशी विवाह केला तरी त्याला किंवा तिला आंतरजातीय विवाह प्रमाणपत्राचा हक्क मिळू शकत नाही. पती-पत्नी जन्माने एकाच समाजाशी संबंधित असतील तर केवळ धर्मांतरामुळे त्यांची जात बदलू शकत नाही. त्यामुळे असा विवाह आंतरजातीय विवाह मानला जाऊ शकत नाही.