किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 31°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशदहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले,
चेन्नई/तेलंगणा, २७ नोव्हेंबर – दक्षिण भारतातील संततधार पावसामुळे, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला तडाखा बसला असून, पावसाशी संबंधित घटनांमध्ये ५० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी बारा जिल्ह्यांतील निवारा केंद्रात हलवण्यात आले असून, चेन्नईतील ६५० लोकांना पाच निवारा केंद्रांत हलवण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पावसाच्या पृष्ठभूमीवर तामिळनाडूतील तुतीकोरिन आणि तिरुनेलवेली येथील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकार्यांनी आज शनिवारी सुटी जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री आंध्र प्रदेशात ४४ लोकांचा मृत्यू झाला असून, १६ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. जवळपास २००० गावे अभूतपूर्व पावसामुळे प्रभावित झाली आहेत. २११ गावे पूर्णपणे जलमय झाली आहेत. सुमारे एक लाख कुटुंबांना पुराचा फटका बसला असून, आंध्र प्रदेश सरकारने भरपाईची घोषणा केली आहे.
दरम्यान, चेन्नईसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. चेन्नईसह पुद्दूचेरीत येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने म्हटले आहे. विविध ठिकाणी १५२ जनावारांचा मृत्यू झाला आहे. तर ६८१ घरांची पडझड झाली आहे. पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे राजधानीतील भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.