किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैदराबाद, (०८ एप्रिल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद येथे सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एम्स बीबीनगर उदघाटन केले. पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि इतर विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली. यादरम्यान त्यांनी जाहीर सभेलाही संबोधित केले. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या नव्या भारतात देशवासीयांच्या आशा पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य आहे, परंतु मूठभर लोक विकासाच्या या कामांमुळे नाराज आहेत. कुटुंबवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार जोपासणार्या अशा लोकांना प्रामाणिकपणे काम होत असल्यामुळे अडचणी येत आहेत.
प्रधानमंत्री पुढे म्हणाले, परिवारवाद आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देणार्या राजकीय पक्ष भ्रष्टाचाराचा पैसा त्यांच्या कुटुंबाकडेच येत राहावा यासाठी अशी मनीषा ठेऊन असतात. गरिबांसाठी पाठवलेला पैसा त्यांच्या भ्रष्ट इको-सिस्टीममध्ये वाटण्यासाठी उपयोगी पडायला हवा. पण आज भ्रष्टाचाराच्या मुळावरच हल्ला चढवला आहे. काही राजकीय पक्ष संरक्षणासाठी न्यायालयात गेले, मात्र न्यायालयाने त्यांना दणका देत रिकाम्या हाताने परत पाठवले. पीएम मोदी म्हणाले की, तेलंगणाला एम्स देण्याचा बहुमानही आमच्या सरकारला मिळाला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमध्ये मला एका गोष्टीची खूप वेदना होत आहे. केंद्राच्या बहुतांश प्रकल्पांमध्ये राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे प्रत्येक प्रकल्पाला विलंब होत असून त्याचा त्रास तुम्हा लोकांना होत आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो की, विकासाशी संबंधित कोणत्याही कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये.
तेलंगणाच्या विकासाला गती देण्याचे सौभाग्य आज मला मिळाले. तेलंगणाच्या निर्मितीत जनता जनार्दनने दिलेल्या योगदानाला मी नमन करतो. तेलंगणातील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केंद्रातील एनडीए सरकारने केला आहे. पीएम मोदी हैदराबादच्या बेगमपट्टी विमानतळावर पोहोचल्यावर राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन आणि इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोहोचून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि शाळकरी मुलांशी संवादही साधला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले नाहीत. केसीआर हे पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या कार्यक्रमापासून दुर राहिले.