किमान तापमान : 29.05° से.
कमाल तापमान : 30.34° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 5.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.34° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– काँग्रेसला ३ दिवसात ३ मोठे धक्के !,
नवी दिल्ली, (०८ एप्रिल) – काँग्रेस सध्या अत्यंत वाईट टप्प्यात आहे. पक्षातील विश्वासू नेतेही आता काँग्रेस सोडत आहेत. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला तीन दिवसांत सलग तिसरा धक्का बसला आहे. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी शनिवारी (८ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. केसवन यांनी महिनाभरापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
वृत्तानुसार, काँग्रेस सोडताना केशवन यांनी काँग्रेसमध्ये ज्याप्रकारे राजकारण सुरू आहे त्यावर ते खूश नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, ’मी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसवर कोणतेही वक्तव्य करावे असे मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये ज्या प्रकारचे राजकारण होत आहे ते मला पटत नाही आणि पक्ष सोडणे हा योग्य निर्णय आहे आणि आज मी तेच केले. केशवन म्हणाले होते, ’मी गेली २२ वर्षे काँग्रेसचा भाग आहे, पण कालांतराने मला कळले की काँग्रेसचा दृष्टिकोन रचनात्मक किंवा ठोस नाही. मी ज्या मूल्यांसाठी काम केले ते बदलले आहेत.’
अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी शुक्रवारीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनीही फार पूर्वीच काँग्रेस सोडली होती. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी काँग्रेस हायकमांडवर प्रश्न उपस्थित केले. याआधी शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना केंद्रीय मंत्री पियुष गोयल, व्ही मुरलीधरन, केरळ भाजप युनिटचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले. अनिल यांनी गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर गदारोळ झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.