किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, (७ मार्च) – नागालँडबाबत सरकारचे सूत्र निश्चित झाले असून, एनडीपीपीचे निफियु रिओ मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या येथील निवासस्थानी सरकार स्थापनेबाबत बैठक झाली. या बैठकीसाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा देखील उपस्थित होते.
शनिवारी एनडीपीपीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. नेफियु रिओ यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. ७ मार्च रोजी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी नेफियू रिओ यांनी शनिवारीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी ट्विट केले की, माझा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे मी नागालँडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल एल. ए. गणेशन् यांच्याकडे दिला आहे.
तीन राज्यांचा शपथविधी सोहळा
नागालँड आणि मेघालयाचा शपथविधी सोहळा मंगळवारी तर, त्रिपुराचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडणार आहे. मेघालयाचा शपथविधी सोहळा ११ वाजता तर, नागालँडचा शपथविधी सोहळा दुपारी पावणेदोन वाजता पार पडणार आहे. त्रिपुराचा शपथविधी सोहळा बुधवारी ११ वाजता पार पडणार आहे. तिन्ही राज्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.