किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलविधानसभेच्या सातव्या अधिवेशनाला सुरुवात,
कोहिमा, २० फेब्रुवारी – नागालँड राज्याच्या स्थापनेपासून प्रथमच राज्याच्या विधानसभेत राष्ट्रगीताचे सूर गुंजले. नागालँडच्या तेराव्या विधानसभेच्या सातव्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. इतक्या वर्षांत प्रथमच ही सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. नागालँडचे राज्यपाल आर. एन. रवि यांच्या अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीत सादर करण्यात आले, असे नागालँड राज्याचे भाजपा अध्यक्ष तेमजेन इम्ना आलोंग यांनी सांगितले. यात कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा भाग नसून राष्ट्रगीताने विधानसभेच्या अधिवेशनाची झालेली सुरुवात सर्वच सदस्यांनी सकारात्मकरीत्या स्वीकारली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
१ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून आजतागायत विधानसभेत अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवण्याची परंपरा नव्हती. मात्र, जर अशी सुरुवात केली जात असेल, तर ते केव्हाही स्वागतार्ह आहे, असे मत नागालँडच्या विधानसभेचे सचिव डॉ. पी. जे. ऍंटोनी यांनी मांडले. माजी विधानसभा अध्यक्षांनीदेखील या नव्या परंपरेचे मोकळ्या मनाने स्वागत केले आहे. यापूर्वी तीन वर्षाआधी त्रिपुराच्या इतिहासातदेखील पहिल्यांदाच विधानसभेत राष्ट्रगीत वाजविण्यात आले होते.